विट्याच्या राजाची प्रतिष्ठापना

विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाचे कार्यकर्ते सागर रोकडे व यामिनी रोकडे या दाम्पत्याच्या हस्ते राजाच्या मूर्तीची पूजा करून सकाळी ११ वाजून २२ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर , कार्याध्यक्ष आमदार सुहास बाबर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभूराजे देसाई हे विट्याच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत. त्यांच्या हस्ते आरती होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष पप्पू दाजी कदम यांनी दिली.

विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी लालबाग राजाची मूर्ती तयार करणारे मूर्तिकार संतोष कांबळे यांच्याकडून विट्याच्या राजाची मूर्ती आणली जाते. मंडळाचे आधारस्तंभ स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची १५ वर्षांपूर्वी वाटचाल सुरु झाली. यंदा साकारलेली विट्याचा राजा मंडळाचा सेट ख्यातनाम कला दिग्दर्शक करत असतात. यंदा हत्ती महाल देखावा उभा करण्यात येत आहे. भव्यदिव्य गजकेसरीची मूर्ती प्रवेशद्वारात साकारली आहे. भव्यदीव्य गजकेसरीची मूर्ती प्रवेशद्वारात साकारली आहे. आतल्या बाजूस तब्बल १४ हत्तींची भव्य प्रतिकृती उभारली आहे. दुमजली उभारल्या जाणाऱ्या सेटमध्ये भाविकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. देखावा पहिल्या दिवसापासून खुला करण्यात आला आहे.