साहित्य
- 250 ग्रॅम कैरी
- 100 ग्रॅम गूळ
- 2 लवंग
- 1/4 चमचा वेलची पावडर
कृती
- प्रथम एक कैरी घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी ,आणि कैरीची साल काढून घ्यावे .
- मग त्यानंतर साल काढून घेतलेली कैरी किसणीवर किसून घ्यावी .
- नंतर कढई गरम झाल्यावर त्यात किसून घेतलेली कैरी घालावी . आणि 100 ग्रॅम गूळ घालून मंद गॅसवर ठेवून, गूळ पूर्ण वितळवून घ्यावा . आणी पाक 15 ते 20 मिनिटे शिजवून घेऊन . त्यात एक छोटा चमचा वेलची पावडर, 3-4 लवंग घालून चांगले परतून घ्यावे . मग त्यात थोडे मीठ घालून, पाकाची तार आली, म्हणजे आपला कैरीचा छान मुरांबा छान तयार झाला.
