आटपाडी येथील शांती कॉलनीमध्ये गटारी व्यवस्थित न बांधल्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत आहे . केलेले रस्ते जमिनीची लेव्हल धरून नसल्याने अनेक ठिकाणी गटारीचे पाणी साचून रस्त्यावरून वाहते आहे. नगरपंचायतीने स्वच्छेतेकडेच दुर्लक्ष केल्यामुळे येथे झाडाझुडपांचे दर्शनही होत आहे. रोगराईच्या प्रश्नांबरोबरच येथे आटपाडी नगरपंचायतीची दिवाबत्तीचीही सोय नसल्याने अंधारात या वाहत्या पाण्याचा त्रास आणखीनच होतो आहे. नगरपंचायतीने याकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करावे लागेल , असे प्रसिद्ध पत्रक सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर महेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले नागरिकांनी वेळोवेळी सांगीतल्याप्रमाणे कचरा गाडी वेळेवर येत नाही. भागांमध्ये खूप घाण साचून आहे. वाहती गटार रस्त्यावरच आल्यामुळे चिखल साचून आहे. पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या पाईपलाईन व्यवस्थित मुजवलेल्या नसल्यामुळे रस्ता आणखीनच खराब होत चाललेला आहे. तयार केलेला रस्ता आणि तिथे असलेली घरे आणि त्या घरांची प्लिंथ लेव्हल योग्य पद्धतीने नसल्यमुळे ओम शांती कॉलनी येथे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
