जिल्हा परिषेदेच्या सेस फंडातून शेतकरयांना अवजारे

ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांची गरज व मागणी लक्ष्यात घेऊन सोलापूर जिल्हा परिषेदेच्या सेस फंडातून सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांना विविध अवजारांसह आवश्यक उपकरणे , ट्रॅक्टरचलित अवजारे , कृषी सिंचनासाठी सुधारित अवजारे ही ५० टक्के अनुदानावर डीबीटी धोरणानुसार दिली जाणार आहेत याबाबतची माहित गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी , कृषी विस्तार अधिकारी बाबासाहेब खटकाळे यांनी दिली .

शेतकऱ्यांना २० जून २०२५ पर्यंत सांगोला पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागणार आहे . या योजनेत अल्पभूधारक , दिव्यांग , महिला शेतकरी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा , ८ अ , आधार कार्ड , बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत या कागदपत्रांसह आपले अर्ज पंचायत समितीमध्ये सादर करावेत . डी . बी . टी योजनेतून लाभार्थीची निवड झाल्यावर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून अवजारे खरेदी करावी लागणार आहेत. तसेच खरेदी करावयाची शेती अवजारे अधिकृत समक्ष तपासणी संस्थांनी परीक्षण करून बीआयएस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार , तांत्रिक निकषानुसार असणे आवश्यक असणार आहे. लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल , अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर पी .एफ.एम.एस डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल