वीज खांब वाकला , वायरमनकडून पैशांची मागणी

आटपाडी , तालुक्यातील शेटफळे जवळच्या माळेवाडी गावच्या वस्तीभागात विद्युत खांब वाकून पडल्याने गेले १५ दिवस वीज नाही . करगणी वीज वितरण कंपनी कार्यालय बिलकुल दखल घेत नाही. उलटपक्षी वाऱ्याने वाकून पडलेल्या या विद्युत खांबाचे पैसे द्या तरच वीज प्रवाह सुरळीत करतो, असे तेथील कोणी अधिकारी कि कर्मचारी पैसे मागत असल्याची तक्रार येथील वस्तीलोकांची आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसात वादळाच्या पावसाने माळेवाडी गावातल्या एका वस्तीवरचा विद्युत खांब वाकून तारा जमिनीला टेकून तेथील वीज गेले १५ दिवस बंद आहे. घरात शेतीकामासाठी वीजच नसण्याने मळेवाडीच्या तीन वस्ती भागातील २५ घरे अंधारात आहेत . शेती कामाचाही खोळंबा होय आहे. करगणी वीज वितरणाचे शाखाधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या ग्रामस्थांचा आरोप आहे. दुरुस्ती खांबासाठी कोणी तिथला अधिकारी की कर्मचारी पैसे मागत असल्याची तक्रारही तेथील लोकांची आहे. येथील लोक नियमित वीजबिले भरूनही हा अन्याय होतो आहे . आटपाडी वीज वितरण उपअभियंत्याचेही या कमी दुर्लक्ष होते आहे. वरिष्ठांनी लक्ष्य घालावे अशी मागणी होत आहे.