गेली ५ वर्षे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सुमारे २१४ चारा छावणी चालकांचा अनुदानाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होता.सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सुमारे ३६ कोटी रुपयांचे अनुदान रखडलेले होते. प्रलंबित अनुदानाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने मार्गी लागला आहे.
दिपकआबा साळुंखे पाटील यांनी छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानासाठी बऱ्याच वेळा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेही दिपकआबांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलेले आहे.
बुधवार दि ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजात सांगोला तालुक्यातील चारा छावणी चालक संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या दालनात त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार केला.
सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी माझी सुमारे 40 ते 50 वेळा भेट घेतली. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. आबांच्या आग्रहाखातर अजितदादा पवार यांनी चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानाच्या प्रश्नावर तात्काळ मार्ग काढण्याचे आदेश मला दिले.
अजितदादा पवार यांचे आदेश आणि दिपकआबा साळुंखे पाटील यांचा पाठपुरावा यामुळे चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.खऱ्या अर्थाने दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान मिळणार असल्याने हे यश माझे नसून ते दिपकआबांचेच असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह चारा छावणी संघटनेचे परमेश्वर सरगर, विकास देवकते, कैलास माळी, अनिल पाटील, विनायक मिसाळ, प्रवीण नवले, वसंत रूपनर आदीसह सांगोला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षात कार्यरत असणारे चारा छावणी चालक उपस्थित होते.