आम्हीही रुपया देतो, दिघंची गायरानात जागा द्या

आम्हीही एक रुपया देतो,दिघंची गायरानात आम्हालाही जागा द्या ‘ म्हणून गायरानातील रहिवाशांनी बहुजन समाज पक्षाचे खानापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तहसील कार्यालयात चक्क रुपयांची चिल्लर उधळण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे यांनी तहसील कार्यालयात आंदोलकांना बोलावून चर्चा केली. आटपाडी वीज वितरण आणि जिल्हा सिव्हिल डिपार्टमेंट यांच्याशी फोनवरून चर्चा करून १ जुलै रोजी मीटिंगचे आयोजन केले तसेच सब स्टेशनचे बांधकाम थांबवण्यास सांगितले.

हेगडे यांनी ३० जुलैपासून धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे. आंदोलनस्थळी कोणी भेट देण्यास अधिकारी येत नसल्याचे पाहताच ‘एक रुपयाचा कढीपत्ता,अधिकारी झाला बेपत्ता’अशा घोषणा देण्यात आल्या. या धरणे आंदोलनवेळी बसपचे प्रभारी जिल्हाधक्ष्य देवानंद जावीर, शहराध्यक्ष संतोषराव रणदिवे, दत्तात्रय हातेकर ,अरुफ तांबोळी,मुबारक तांबोळी , पायल लोहार, शंकुतला माने उपस्थित होते.