जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सांगोला शाखा अभियंता बाळासाहेब नकाते यांची कन्या शीतल बाळासाहेब नकाते यांनी सलग ७ परीक्षेत यश मिळवत एमपीएससी मार्फत २०२३ (एमईएस ) मध्ये घेतल्या गेलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट (WRD) मध्ये सहाय्यक अभियंता वर्ग १- अधिकारी (Class 1 officer) पदी निवड झाली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतल्यानंतर जून २०१९ पासून ते जानेवारी २०२४ दरम्यान स्पर्धा परीक्षा तयारी केली. त्यानंतर दिलेल्या विविध परीक्षेतून एकूण ७ सरकारी पोस्ट (खुल्या गटातून ) त्यांनी मिळविल्या सध्या सर्वेअर ट्रेड साठी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणू शासकीय तंत्रनिकेतन संस्था औंध पुणे येथे त्या कार्यरत आहेत.
सलग ७ शासकीय पदांवर यशस्वी ठरलेली शीतल नकाते आता वर्ग १ अधिकारी
