गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांची भर पावसात व चिखलात जाऊन दिली भेट

गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी (UmeshChandra Kulkarni) यांची भर पावसात व चिखलात जाऊन दिली भेट ग्रामपंचायत महुद ला अशुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा बाबत उमेशचंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी पाणीपुरवठा विहिरीवर भर पावसात व चिखलातून ग्रामस्थ व तक्रारदार जितेंद्र बाजरे यांचे सह भेट दिली पाणीपुरवठा विहिरीत मासे असल्याने तेथे टीसीएल टाकणे योग्य होणार नाही त्यासाठी पाणीपुरवठा टाकी उद्या स्वच्छ करून टीसीएल टाकून धुऊन घेऊन त्यानंतर टाकीमध्ये क्लोरनेशन करून व ओटी टेस्ट घेऊन पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या त्यावेळी त्यांचे सोबत पंचायत विस्तार अधिकारी देवराज पुकळे , विस्ताराधिकारी आरोग्य मिलिंद सावंत, पंचायत अधिकारी बाळासाहेब शिंदे , आरोग्य सहाय्यक नंदकुमा पोतदार, आरोग्य सेवक विजय दांदडे , नवनाथ मोरे तसेच ग्रामस्थ व प्रतिष्ठीत व्यक्ती लिंगराज येडगे, संजय पाटील , धनाजी कांबळे , ग्रामपंचायत कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थीत होते त्या वेळेस पाणी नमूने तपासणीस प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सुचना गटविकास अधिकारी यांचेकडून देण्यात आल्या.