फ्रीजमध्ये ठेवा मीठाने भरलेली वाटी ! पावसाळ्यात मिळतील ‘हे’ मोठे फायदे

सध्या पावसाळ्याचा सीजन सुरु आहे यामुळे हवेत ओलावा जास्त असल्यामुळे या दिवसांत घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही त्याचा परिणाम होतो. घरातला फ्रिजही त्याला अपवाद नाही. पावसात फ्रिज उघडझाप जास्त होते आणि त्यामुळे त्याच्या आत ओलावा जमा होते. याचा परिणाम असा होतो की, फळं-भाज्या लवकर खराब होतात, बॅक्टेरिया वाढतात आणि वासही येऊ लागतो. ही समस्या टाळायची असेल तर एक सोप्पा उपाय आहे – फ्रिजमध्ये मीठ (Salt) ठेवणं मीठ ओलावा शोषण्याचं काम करतं. म्हणूनच फ्रिजमध्ये एक छोट्या वाटीत 100-150 ग्रॅम जाड मीठ ठेवलं तर ते ओलावा शोषून घेतं आणि फ्रिज कोरडा राहतो.

ओलावा कमी झाला की फळं-भाज्या टिकतात आणि बॅक्टेरिया वाढत नाहीत. त्यामुळे फ्रिज स्वच्छ आणि सुरक्षित राहतो. फ्रिजमध्ये ज्या वेळी अन्नपदार्थ खराब होईल लागतात, तेव्हा त्यातून वास निघतो. हा वास संपूर्ण फ्रिजमध्ये पसरतो. अशावेळी मीठ फक्त ओलावा नाही, तर दुर्गंधीही शोषून घेतं. त्यामुळे फ्रिजमध्ये टाकलेलं मीठ फ्रेशनेस टिकवून ठेवतं. फ्रिजमध्ये ठेवलं जाणारं मीठ दर 15-20 दिवसांनी बदलणं गरजेचं आहे. कारण एकदा मीठ ओलावा शोषून घेतलं की त्याची क्षमता कमी होते. जर तुम्हाला मीठ नको असेल तर त्याऐवजी बेकिंग सोडाही वापरू शकता. बेकिंग सोडादेखील वास कमी करण्यात आणि ओलावा शोषण्यात मदत करतं.