सांगोला,अज्ञात चोरट्याने मॉलच्या पाठीमागील शटर उचकटून आत प्रवेश करीत मॉलमधील साखर , तेल डबे, ड्राय फ्रुट्स,महागडे सौदंर्य प्रसाधने , जीवनावश्यक वस्तूंसह रोख ४० हजार रुपयेसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे साहित्य असा सुमारे ३ लाख रुपयेचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. ही घटना रविवार २० जुलै रोजी सकाळी ८ च्या पूर्वी महुद (ता. सांगोला ) येथील पंढरपूर रोडवरील किरण सुपर मार्केट मॉलमध्ये घडली.
महूद येथील व्यापारी किरण गांधी यांच्या मालकीचे महुद – पंढरपूर रोडलगत किरण ट्रेडिंग कंपनी अंतर्गत किरण सुपर मार्केट जीवनावश्यक वस्तूंचा मॉल असून, त्याठिकाणी सदरची घटना घडली. मॉलमधील साखरेचे गट्टे , १२ तेलाचे डबे , विविध प्रकारची ड्राय फ्रुट्स , महागडे विविध प्रकारच्या सौदंर्य प्रसाधनाच्या वस्तू तसेच काउंटरच्या ड्रायव्हर मधील १२ हजाराच्या चिल्लरसह २८ हजाराची रोकड असा सुमारे ३ लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी करून जाताना सीसीटीव्ही कॅमऱ्याचे साहित्य घेऊन पसार झाले.
