घनकचरा व्यवस्थापनचा पदभार शितल पाटील यांच्याकडे

इचलकरंजी, कचरा उठाव व कचरा व्यवस्थापनाबाबत संदर्भात महाविकास आघाडीने केलेल्या तक्रारीनंतर डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्याकडे असलेला घनकचरा व्यवस्थापनचा पदभार शितल पाटील (Sheetal Patil) यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायुक्त अशोक कुंभार, सहाय्यक आयुक्त विजय राजापूरे या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन व त्यामध्ये झालेल्या घोटाळ्या संदर्भात अहवाल घेण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी यासंदर्भात काम चालू असून सोमवारी २८ रोजी भेटण्याचे आश्वासन दिले. शहरातील घनकचरा व्यवस्थापन व त्यामध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात महाविकास आघाडीच्यावतीने आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले होते. चर्चे दरम्यान आयुक्तांनी १८ जुलै अखेर अहवाल समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच अहवाला संदर्भात सोमवारी २१ रोजी भेटण्यासाठी बोलवले होते. त्यानुसार आयुक्तांची भेट घेण्यासाठी शंशाक बावचकर, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे आदि पदाधिकारी गेले होते. मात्र सहाय्यक आयुक्तांची यांची भेट घेतली. यावेळी यासंदर्भात माहिती घेण्याचे काम चालू असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल व २८ जुलैला भेटण्याचे आश्वासन सहाय्यक आयुक्त शिंदे यांनी दिले.