तुम्हीही शेअर मार्केटमध्ये करताय गुंतवणुक या IPO मध्ये गुंतवणुकीपूर्वी राहा सतर्क

अलीकडच्या काळात शेअर मार्केटचे वारे सगळीकडेच जोर धरत आहे. दररोज दर सेकंदाला कमी जास्त चढ उतार हे होत राहतात. काहीजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना चलबिचल मन होत असते. कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणुक करताना खूप विचार करून माहिती घेऊन करावे लागते.

लहान मुलांसाठी उत्पादनं तयार करणारी कंपनी फ्रर्स्टक्रायच्या  मालकीची कंपनी ब्रेनबीज सोल्यूशन्स लिमिटेड बाजारातून निधी जमावणार आहे. कंपनी आयपीओ (Firstcry IPO) आणत आहे. कंपनीने त्यासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यांनी आवश्यक कागदपत्रे सेबीकडे दाखल केली आहेत. आयपीओमध्ये फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल (OFS) असे दोन्ही पर्याय गुंतवणुकीसाठी असतील. ऑफर फॉर सेलमध्ये अनेक मोठे शेअरधारक कंपनीतील त्यांचा वाटा कमी करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा यांचा पण सहभाग आहे. ते पण हिस्सा विक्री करण्याच्या तयारीत आहे.

रतन टाटा हे त्यांचा पूर्ण वाटा विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी 2016 मध्ये 66 लाख रुपयांचा वाटा खरेदी केला होता. त्यांचा कंपनीत 77,900 शेअर म्हणजे 0.02 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. हा संपूर्ण वाटा ते विक्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी आवश्यक कागदपत्रे दाखल केली आहेत.

सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रात कंपनीने आयपीओची माहिती दिली आहे. त्यानुसार, पुणे येथील ही कंपनी आयपीओमध्ये 1,816 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर बाजारात उतरवणार आहे. तर सध्याच्या शेअरधाराकांकडून 5.44 कोटींचे इक्विटी शेअरची विक्री करण्याची (OFS)तयारी करण्यात आली आहे. आयपीओची एकूण साईज आणि इश्यू प्राईस याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

टाटा यांच्या व्यतिरिक्त महिंद्रा अँड महिंद्रा 28 लाखांचे शेअर विक्री करेल. या कंपनीतील हा त्यांचा 0.58 टक्के वाटा आहे. गुंतवणूकदार बँक सॉफ्टबँक पण 2.03 कोटींचे शेअर विक्री करणार आहे. एका वृत्तानुसार, सॉफ्टबँकेने कंपनीतील 630 कोटी रुपयांचे सेअर विक्री केले आहे. हे शेअर सचिन तेंडुलकर, इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिश गोपालकृष्णन, के रवि मोदी, वॅलेंट मॉरीशस, टीआयएमएफ, थिंक इंडिया, अपॉर्चुनिटीज फंड, श्रोडर्स कॅपिटल आणि पीआई अपॉर्चुनिटीज यांनी पण वाटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

फ्रर्स्टक्रायचा तोटा वाढत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा तोटा 6 पट वाढला आहे. तोटा 79 कोटींहून 486 कोटीवर पोहचला आहे. एकूण महसूलात 135 टक्क्यांची तेजी आहे. हा आकडा 5,633 कोटींवर पोहचला आहे. फर्स्टक्राय आता 5000 कोटींचा महसूल जमा करणारे स्टार्टअप्स झाले आहे.