राजारामबापू बँकेस राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक पुरस्कार  

इस्लामपूर, येथील राजारामबापू सहकारी बँकेस (Rajarambapu Bank) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने शेड्युल्ड मल्टीस्टेट नागरी सहकारी बँकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वर्ष २०२३-२४ साठीचा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट शेड्युल्ड नागरी सहकारी बँक पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बँकेचे नूतन अध्यक्ष विजयराव यादव, व्हा. चेअरमन माणिकराव पाटील, माजी चेअरमन प्रा. शामराव पाटील, तसेच संचालक धनाजी पाटील, जयकर गावडे, सुभाष सूर्यवंशी, अनिल गायकवाड, नामदेव मोहिते, संभाजी पाटील, प्रशांत पाटील, सुरेश पाटील, शहाजी माळी, अशोक पाटील, राजेश पाटील आणि संचालिका सौ. कमल पाटील उपस्थित होते.