लोटेवाडीच्या सरपंचपदी नकुशा लवटे यांची बिनविरोध निवड

लोटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नकुशा मधुकर लवटे यांची बिनविरोध निवड झाली. लोटेवाडी ग्रामपंचायतच्या ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी नुकताच दीपाली प्रकाश लवटे यांनी राजीनामा दिला. यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नकुशा लवटे (Nakusha Lovete) यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना शहाजी बापू पाटील व उत्तम खांडेकर यांच्या पॅनलच्या सात सदस्यांनी उपस्थिती दाखवली विरोधात कोणताही अर्ज न आल्याने व बाकीचे सर्व सदस्य अनुपस्थित राहिले , बिनविरोध निवड झाली . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी विकास जाधव , ग्रामसेवक समाधान आदाटे यांनी काम पाहिले.यावेळी नामदेव लवटे , हिराबाई सरगर , दीपाली लवटे , विजय खांडेकर ,सत्यवान देशमुख ,शांताबाई चव्हाण हे सदस्य उपस्थित होते.