लोकेनते राजारामबापू पाटील (Rajarambapu Patil) यांच्या १०६ जयंतीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी दिवंगत कामगारांच्या कुटुंबीयांचा शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्जेराव यादव हॉलमध्ये स्नेह मेळावा आयोजित केला आहे. तत्पूर्वी या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व उपचार केले जाणार आहेत. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते सकाळी ७.३० वाजता कारखाना कार्यशाळावर स्व. बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून अभिवादन केले जाणार आहे.
यावेळी युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या सह जिल्ह्यातील मान्यवर व बापू प्रेमी उपस्थित राहणार आहेत. यानंतर आ. जयंतराव पाटील याच्या हस्ते साखराळ युनिट मध्ये सुरू करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहेत. कारखान्याच्या ४ ही युनिटमधील कामगार- अधिकारी दि. १ ऑगस्ट रोजी विक्रमी संख्येने रक्तदान करणार आहेत.
