स्व . गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त नाझरे येथे रक्तदान शिबीर

माझी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे , ता. .सांगोला येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात (Blood Donation) ७७ जणांनी रक्तदान केले. अक्षय ब्लड बँक तर्फे रक्त संकलन करण्यात आले. यावेळी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी रक्तदात्याचे कौतुक केले. याप्रसंगी माजी उपसभापती सुनील चौगुले , शिक्षक नेते अशोक पाटील , डॉ. विजय सागर , चेअरमन सुनील बनसोडे , पिंटू बंडगर , हनुमंत सरगर , संजय सरगर , नामदेव बंडगर , राजू बंडगर , डॉ. प्रशांत शिंदे , सुवर्णा पाटील तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर , प्रा . विजय गोडसे बाळासो चौगुले रक्तदाते उपस्थित होते. रक्तदात्यास आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्य , नागरिक उपस्थित होते.