अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय मागे घ्यावा डांगे यांची प्रतिक्रिया

कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढवून सांगली ‘एक तृतीय अंश पाण्याखाली बुडवायची आहे का ? असे असेल तर कर्नाटक आणी महाराष्ट्र यांचे संबंध संवर्धाचे राहिलेले आहेत ते भविष्यात कसे राहतील. आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांचे प्रेम व आज जे संबंध आपुलकीचे आहेत. ते टिकतील का ? याचा गांभिर्याने विचार करावा आणि धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी प्रतिक्रिया माजी जेष्ठ मंत्री अण्णा डांगे यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणी खासदार बसवराज बोम्मई व शिष्टमंडळाने केंद्रिय जल मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेवून कर्नाटकचे सरकार केंद्र सरकारवर धरणाची उंची वाढविण्याबाबत दबाव वाढवत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षिय शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे अलमट्टी धरणाची उंची वाढविणेस यापूर्वीच विरोध केला आहे. फडणवीस व सर्वपक्षिय शिष्टमंडळाची मागणी योग्य असून केंद्र सरकारने धरणाची उंची वाढविणेस परवानगी देवू नये. असे डांगे यांनी म्हटले आहे.