एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उमेद मॉल्स उभारण्यात येणार

इचलकरंजी ,महिलांच्या जिवनामध्ये झळाळी आणण्यासाठी महिला सक्षमीकरण आणि महिलांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत तब्बल २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे,

 या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल्स (Umed Malls)उभारण्यात येणार आहेत हे अभियान ग्रामीण भागातील विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असतील. या मॉल्समुळे बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला, खाद्यपदार्थ, वस्त्रे व इतर उत्पादनांसाठी स्थानिक बाजारपेठ मिळणार तसेच महिलांना उद्योगधंद्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिलेला आधार आहे. उमेद मॉल या योजनेमुळे महिलांची आणखीन ताकद वाढणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना महिला सक्षमीकरण समन्वयक अनिता माळगे यांनी केले.

 याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार धैर्यशील माने, कोल्हापुर शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला सक्षमीकरण समन्वयक, महाराष्ट्र राज्य जिल्हा संपर्कप्रमुख सौ. अनिता माळगे यांच्या प्रमुख उपस्थित महिला सक्षमीकरण कोल्हापूर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, यांच्या उपस्थित महिलाआघाडी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख सौ. संगिता नरके, युवतीसेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंत्रे, इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ स्नेहांकिता भंडारे, सौ. ज्योत्सना भिसे, सौ. उमा जाधव,सौ. शारदा जाधव, शकुंतला पाटील, चित्रा दुधाणे, जुलेखा मुल्लाणी, ज्योत्सना पाटील, राणी तिवढे, कविता शिंदे, सविता माने, सरिता भोसले, ज्योती चौगुले, अश्विनी लोहार, चिंगुताई पाटील, ज्योती चौगुले, सरिता पांडव, हेमलता जाधव, मिना जाधव, मनिषा माने, शकुंतला चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.