गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने कृष्णा नदीस पुर आलेला आहे. इचलकरंजी शहराला मजरेवाडी उपसा केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु याठिकाणी वीज पुरवठा करणारी विद्युत वाहिनी तुटल्याने केंद्रातील वीज पुरवठा खंडित झाला होता. पूर परिस्थिती असतानाही महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी पूर परिस्थितीमध्ये शहराचा पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.
इचलकरंजी शहरास पाणी पुरवठा होणाऱ्या मजरेवाडी उपसा केंद्रास वीज पुरवठा होत असलेली विद्युत वाहिनी तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी उपसा बंद झाल्याने शहराचा पाणी पुरवठाही अनियमित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने महानगरपालिकेच्या वतीने महावितरण कंपनीच्या सहकार्याने बोटीतून जावून वीज पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला. त्यामुळे पाणी उपसा सुरू झाल्याने शहराचा पाणी पुरवठा नियमित होणार आहे.
विद्युत वाहिनी तुटल्याने पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागास दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा अभियंता बाजी कांबळे यांनी कृष्णा नदीला आलेल्या महापुरात जाऊन मजरेवाडी उपसा केंद्राचा वीज पुरवठा सुरळीत करताना कर्मचारी. पाण्यात बोटीने जावून वीज वितरण कंपनी कुरुंदवाड ग्रामीणचे लाईनमन मनोहर भंडारे, संदीप कांबळे, सुरज माळी, राकेश नरुटे तसेच वसंत कळेकर, सर्फराज पटेल, केदार रणविरे, संदेश सूर्यवंशी यांच्या सहाय्याने तुटलेली विद्युत वाहिनी जोडून उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला आहे.