हातकणंगले,आळते गावच्या हद्दीत हातकणंगले-वडगाव रस्त्यावर साडेसातच्या सुमारास रस्ताओलांडत असलेल्या मेढपाळास युनिकॉर्न मोटार सायकलने पाठीमागून धडक दिल्याने बाळु सोमा गावडे (वय ६०, रा. आळते) हे ठार झाले .
याबाबतची वर्दी संदिप बाळासाहेब बोते (वय ३९) यांनी दिली असून हातकणंगले पोलीसांनी रस्त्यावर मोटार सायकल चालक अतुल गुरुवारी सुरेश फारणे (वय ३५) रा. शिगाव सकाळी ता. वाळवा जि. सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.साडेसातच्या सुमारास बाळु गावडे हे सकाळी मेंढरे चारून दुधाची किटली घेऊन घराकडे जात होते.
जल्लोश हॉटेल शेजारी रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या युनिकॉर्न गाडी (एमएच०९ एफएच ८८ ७९) ने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली असा परिवार आहे.
या पोलीसांनी मोटार सायकलस्वार चालक अतुल फारणे याच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो. हे काँ. करोशी करीत आहेत.
