हातकणंगले नगर पंचायतीच्या प्रभाग रचना जाहीर

हातकणंगले, हातकणंगले नगर पंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी सतरा प्रभागांच्या प्रारूप रचनेची यादी सोमवारी (ता. १८) जाहिर करण्यात आली असून यासाठी सन २०११ची जनगणना गृहित धरण्यात आली आहे.

 हातकणंगले गावची १३, ६७९ लोकसंख्या असून यामध्ये ७१२७ पुरुष व ६५५२ स्त्रीया आहेत. प्रत्येक प्रभागात सुमारे ८०५ लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. प्रभाग रचना करताना सॅटेलाईट मॅप नुसार भौगोलिक परिस्थिती गृहित धरण्यात आली असली तरी ज्या नागरीकांना सदरची रचना गैर सोयीची वाटल्यास त्यांनी २१ ऑगस्ट दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या हरकती नगर पंचायतीत द्याव्यात यावर वेगवेळी सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल असे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी सुचित केले आहे.

 हातकणंगले नगर पंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक ३० डिसेंबर २०१९ ला पार पडली होती. यावेळीही प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक याप्रमाणे १७ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या तर पहिला नगराध्यक्ष जनतेतून निवडण्यात आला होता. अशा १८ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या सर्व पदाधिकाऱ्यांची मुदत संपूर्ण साडेसात महिने होत आले आहेत. यामुळे निवडणुक विभागाने निवडणूक घेण्यासाठी प्रक्रिया चालु केली आहे सर्व साधारण गटासाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. नविन प्रभागांची रचना काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे काहीना ते गैर सोयीचे वाटत असल्याने मोठ्या प्रमाणात हरकती येण्याची शक्यता आहे. यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे.