जुगार अड्डयावर धाड ;२६ हजाराचा मुद्देमाल जप्त

जवळा- घेरडी रोडवर असणाऱ्या मुक्ताई ट्रेडर्स दुकानाच्या बाजुस उंबराच्या झाडाखाली सुरू असणाऱ्या मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करत सुमारे २६ हजार ४१० रुपये रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी मोहन दगडु बंडगर, अंकुश बलभिम पाटील (दोघे रा. शिरनांदगी ता. मंगळवेढा), सचिन महादेव शेंडगे (रा. मेडशिंगे ता. सांगोला), दिपक गोरख बाबर (रा. मानेगाव ता. सांगोला), धनाजी नामदेव गेजगे (रा. घेरडी ता. सांगोला), विशाल दगडू सुरवसे (रा. जवळा), सुरेश पांडुरंग हगवणे (रा. जवळा), भारत तात्याबा बुरुंगले (रा. घेरडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.