शिवाजीराव कदम पतसंस्थेच्या ठेव योजनेचे बक्षीस वितरण 

मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजीराव कदम (Shivajirao Kadam) सह. नागरी पतसंस्थेच्या वतीने गृहलक्ष्मी ठेव योजनेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी संस्थेचे चेअरमन उध्दव कदम, व्हा. चेअरमन बापूसो कदम, संचालक चाँद पठाण, संतोष कदम, वसंत कदम, संचालिका सुनंदा कदम हे प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक प्रकाश कदम यांनी केले. संस्थेच्या वतीने गेली पंचवीस वर्षे महिलांना बचतीच्या  माध्यमातून स्वनिर्भर करण्याचे काम गृहलक्ष्मी ठेव योजनेच्या माध्यमातून  करण्यात येत आहे. या बक्षीस वितरणात अनुक्रमे पहिले चार क्रमांक सौ. वंदना बापूसो कदम, सौ. अनिता विजय कदम, सौ. शितल प्रशांत कदम व सौ. माधुरी गुंडाजी जगताप यांना बक्षीसे मिळाली तर उपस्थित महिलांच्यामधून सौ. सुप्रिया अतुल गुरव या भाग्यवान विजेत्या ठरल्या. यावेळी सौ. महानंदा कदम, संचालक शंकर कदम यांनी मनोगत व्यक्त केले. गृहलक्ष्मी ठेव जमा करणाऱ्या सौ. ज्योती आंबी यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रकाश कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी अभिजित मांगलेकर, प्रशांत कदम, रणजीत कदम, अथर्व कदम व सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.