विट्याच्या राजाची भक्ती कधी सोडली नाही. त्यामुळेच त्याचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी कायम आहेत, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी केले.
विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांचा वाढदिवसानिमित्त मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला . यावेळी उपाध्यक्ष पप्पूदाजी कदम, संजय धडस , जय बाबर , इंद्रनील पवार, रणदीप बाबर, सौरभ रोकडे, रणवीर बाबर आदी प्रमुख उपस्थित होते.
अमोल बाबर म्हणाले , आपल्या सामाजिक कामाची सुरवात विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून झाली. कसलीही अपेक्षा व लाभ मनी न ठेवता आपण या मंडळाची स्थापना केली होती. आज ‘विट्याच्या राजा ‘ ने शहर व परिसराच्या लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केले आहे. विट्याच्या राजाची मूर्ती आपला सर्वांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. यावर्षीचा दहा दिवसांचा सोहळा न भूतो न भविष्यती असा साजरा करूया. यावर्षीचा आपला देखावा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक असेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी प्रवीण साठे , माणिक कदम, शुभम बाबर , राहुल भिगारदेवे , विनोद वाले, राजाभाऊ कदम,किरण कुरकुटे , अधिक धडस, हर्षल धडस , माणिक कदम, अजित पवार, युवराज अभंग , प्रवीण रावताळे , विकी वारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
