आमदार चषक महायुती दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने फोडली

पेठवडगाव, बरसणाऱ्या पावसात आणि उसळलेल्या तरुणाईच्या जल्लोषात पेठवडगावचा ऐतिहासिक आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव अविस्मरणीय ठरला. तब्बल २ लाख ५१ हजार बक्षिसांच्या दहीहंडीवर शिरोळच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने मोहोर उमटवत विजेतेपद पटकावले.२ लाख ५१ हजार बक्षिसांच्या दहीहंडीवर उमटवली मोहोर 20.000.00

 पालिका चौकात आम. दलितमित्र अशोकराव माने प्रेमी यांच्या आयोजनाखाली सोहळा झाला. प्रास्ताविकात आमदार डॉ. माने म्हणाले, दहीहंडी फोडणे म्हणजे फक्त माखनहंडी फोडणे नव्हे; तरुणाईच्या जोशाला दिशा देणे, ऐक्याचे बळ दाखवणे आणि परंपरेशी निष्ठा राखणे हा त्यामागील खरा संदेश आहे. नृसिंह गोविंदा, जय महाराष्ट्र गोविंदा, गोडीविहीर गोविंदा यांच्या दमदार पथकांनी सहा-सात थरांची रोमहर्षक सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजा देवकर, तेजल शिंदे, रिलस्टार प्रतीक्षा सूर्यवंशी तसेच कार्टून आन्या, सिद्ध, रवी दाजी यांनी उपस्थिती लावली.

 अखेरीस उत्कंठावर्धक स्पर्धेत जय महाराष्ट्र गोविंदा पथक विजयी ठरले. याप्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी जि.प. सदस्य अरुण इंगवले, शिवाजीराव पाटील, बाजार समिती सभापती सुरेश पाटील, दिलीप पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, अजय थोरात, अरुण पाटील, डॉ. मिलिंद हिरवे, राजवर्धन मोहिते, राजेंद्र माने, दत्तात्रय घुगरे, सुहास राजमाने, वैभव हिरवे, अक्षय मदने, जगन्नाथ माने, तय्यब कुरेशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय यादव यांनी केले.