पेठ वडगावात युवकाचा खून किरकोळ वादातून घटना; संशयिताचे पलायन

पेठ वडगाव (Peth Vadgaon) येथील डवर गल्लीत किरकोळ वादातून डोक्यात लाकडी फळी मारुन एकाचा खून करण्यात आला. संभाजी धर्मा साळुंखे (वय ५०, रा. डवरी गल्ली, पेठवडगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली.

 घटनेनंतर संशयित आरोपी करण भिमराव जगताप (रा. यादवनगर डवरी गल्ली कोल्हापुर) पसार झाला संभाजी साळूंखे व छाया चंद्रकांत शिंदे हे येथील डवर गल्लीत राहतात. छाया शिंदे यांचा जावई करण जगताप आणि संभाजी साळुंखे यांच्यात रविवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणातील रागाच्या भरात जगताप याने रस्त्यावर पडलेली लाकडी फळी संभाजी साळुंखे यांच्या डोक्यात मारली.
फळीचा वार जोरात झाल्याने साळुंखे याचा मृत्यू झाला. मिना संभाजी साळुंखे ( वय ४१) यांनी वडगाव पोलिसात फिर्याद दिली. संशयित आरोपी करण जगताप यास अद्याप अटक झालेली नाही. अधिक तपास पो. नि. प्रमोद शिंदेयांच्या मार्गदर्शनाखाली सहा फौजदार चव्हाण करीत आहे.