रॅगिंग करणे हा गंभीर गुन्हा – आवटे

रॅगिंगमुळे (Ragging) करिअर उद्ध्वस्त होते. रॅगिंग हे अक्षम्य कृत्य व गंभीर गुन्हा आहे. विद्यार्थ्यांनी मैत्रीची विण अधिक घट्ट करीत आपापसात ऋणानुबंध जपावेत. महाविद्यालयीन वयात अंमली पदार्थांपासून दूर राहावे, असे प्रतिपादन आष्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी केले. 

आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. आवटे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अमित पेटकर हे होते. उपप्राचार्य डॉ. विजय डांगे, सपोनि संदीप शितोळे, डॉ. जयवंत खरात, अँटी रॅगिंग कमिटीचे कोऑर्डिनेटर डॉ. दिलीप कटरे हे प्रमुख उपस्थित होते. या सप्ताहात अँटी रॅगिंग पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्हिडिओ ग्राफी स्पर्धा घेण्यात आल्या. अँटी रॅगिंग जनजागृती रॅली काढण्यात रॅगिंग जनजागृती रॅली काढण्यात आली. सपोनि शितोळे म्हणाले, रॅगिंग करणे हा कठोर गंभीर गुन्हा आहे. त्याचा प्रतिबंध झाला पाहिजे. महाविद्यालयीन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टर्सनी यशस्वी जीवनासाठी योगा आणि मेडिटेशन करणे आवश्यक  आहे. त्यांनी रॅगिंगचे दुष्परिणा त्यावरील उपाययोजना, कायदे, शिक्षा याविषयी माहिती दिली. याप्रसंगी डॉ. राधा फडणवीस, डॉ. टिंकू खलचे, डॉ. सुरभी झेंगटे, डॉ. प्रवीण ठोंबरे, स्मिता लोखंडे उपस्थित होते. डॉ. अलकनंदा कुलकर्णी यांनी आभार मानले.