‘या’ मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच …

आता सगळीकडेच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या भाजप तयारीत असल्याची माहिती आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते किरण सामंत निवडणूक लढण्याची शक्यता असतानाच भाजपकडून या मतदारसंघासाठी तयारी सुरु असल्याची माहिती आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेत आहे. ‘मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कोण?’ असं स्टेटस किरण सामंत यांनी ठेवलं आहे. अशातच भाजपकडून मात्र रविद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याच्या सूचना आल्याची माहिती आहे. भाजप कडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होतेय. भाजपने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची मागणी केल्यामुळे शिंदे गट आक्रमक झाल्याची माहिती आहे.