पट्टणकोडोली (Pattankodoli)व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा 1 खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन चंद्रकांत तेली हे होते.
बाळासो हराळे व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.संस्थेचे सचिव विनायक भाटले यांनी अहवाल, विषयपत्रिका व नफा-तोटा पत्रिकेचे वाचन केले. यावेळी बोलताना चेअरमन चंद्रकांत तेली म्हणाले, संस्थेची वार्षिक उलाढाल ४४ कोटी ४७ लाख रुपये असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला २० लाख ३५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला आहे. याप्रसंगी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांनाही चेअरमन चंद्रकांत तेली यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी व्हा. चेअरमन किसन तिरपणकर, मारुती कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्रुती नेर्लेकर यांनी व्हॉलीबॉल व शुटिंग बॉल राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. यावेळी संचालक रामचंद्र जाधव, धुळगोंडा पुजारी, मधुकर स्वामी, सोहम मोरे, सुकुमार रुकडे, प्रविण बोंगाळे, संचालिका लक्ष्मी नेर्लेकर, सुनंदा आडके, सल्लागार रावसाहेब पिराई यांच्यासह सभासद, ठेवीदार, व कर्मचारी उपस्थित होते. संचालक चंद्रकांत चौगुले यांनी आभार मानले.
