विट्यात घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा

विटा (vita) विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व स्व. शोभाकाकी अनिलभाऊ बाबर फाउंडेशन यांच्या वतीने घरगुती गौरी गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विट्याचा राजा मंडळाचे अध्यक्ष व सांगली जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी दिली.

 बाबर म्हणाले, पारंपारिक कला जोपासली जावी आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शोभाकाकी अनिलभाऊ बाबर फाउंडेशन दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करत असते. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी २५ हजार, २० हजार, १५ हजार, ११ हजार, ५ हजार अशी अनुक्रमे पारितोषिके दिली जातील. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस प्रत्येकी २ हजार प्रत्येक विजेत्याला तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. १ सप्टेंबर रोजी तज्ज्ञ परीक्षक सहभागी स्पर्धकांच्या घरी जाऊन गौरी व गणपती आरास सजावटीचे परीक्षण करतील. सजावट करताना सामाजिक संदेश, पर्यावरणपूरक व पारंपारिक थीम यांना प्राधान्य दिले जाणार आहे.