माझा मुलगा प्रतीक पाटील याने सांगली किंवा हातकणंगले लोकसभा मतदार संघातून लढावे, अशी मागणी आहे.त्यासाठी चाचपणी केली आणि दोन्ही ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही,” असे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटीलयांनी नव्या मांडणीचे संकेत दिले आहेत.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगली लोकसभा मतदार संघातून प्रतीक पाटील यांचा दावा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले. काँग्रेस (Congress) आणि विशाल पाटील यांना त्यामुळे धक्का बसू शकतो, अशी शक्यता आहे. जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक याने हातकणंगले किंवा सांगली मतदार संघातून भाजपकडून लोकसभा लढवावी आणि त्याआधी जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशा चर्चा आहेत.