संपूर्ण देशातील एक आदर्श महिला राज्यकर्त्या पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा उरूण इस्लामपूर शहरात पुतळा उभा करणार असल्याची घोषणा माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी उरूण इस्लामपूर येथील समारंभात बोलताना केली. महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त प्रा. डॉ. मानसिंग ठोंबरे (इस्लामपूर) यांचे कर्मयोगिनी अहिल्या या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनचे समन्वयक प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, प्रा. शामराव पाटील, विजयराव यादव,आनंदराव मलगुंडे, विजयराव पाटील, शहाजी पाटील, अरुणादेवी पाटील, सुस्मिता जाधव, प्रा. सुकुमार कांबळे, विवेक कोकरे प्रामुख्याने उपस्थित होते. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, तालुका अध्यक्षा सुनिता देशमाने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आ. पाटील म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा शहरात उभा करीत आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा आपल्या शहरात उभा करू. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती करून या कामास गती देऊ. प्रा. डॉ. मानसिंग ठोंबरे म्हणाले, अहिल्या देवी या रणरागिणी होत्या. त्यांनी अब्दालीसारख्या शत्रूस सामोरे जात रजपूत व जाटां च्यावर मात केली आहे. त्यांनी १८ व्या शतकात विधवेला संपत्तीमध्ये हक्क, नव्या बाजारपेठा आणि विकेंद्रीत न्यायव्यवस्था आदी क्रांतिकारी कार्य केले आहे. अहिल्यादेवींना त्यांची जनता आई मानत होत्या, इतके उत्तम त्यांचे प्रशासन व न्याय व्यवस्था होती. प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनीही मनोगत व्यक्त केले. बजरंग गावडे, राजवीर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विनायक पाटील, दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, पै. भगवान पाटील, कमल पाटील, रोझा किणीकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अहिल्यादेवी प्रेमी उपस्थित होते.
