मृत अवस्थेत सापडलेला लांडगा रेबीज पॉझिटिव्ह

मृत अवस्थेत सापडलेला लांडगा हा वन्यप्राणी रेबीज बाधित असल्याचा खुलासा बावधन-पुणे येथील टी. टी. सी सेंटरने केला आहे. तथापि , लांडग्याने चावा घेतलेल्या ९ रुग्णांनी रेबीज प्रतिकारक लास घेतली असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसून त्यांनी पुढील ‘रेबीज कोर्स ‘ पूर्ण करावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांनी केले आहे. मागील तीन-चार दिवसांत लांडग्याने सांगोला परिसरातील वाड्यावस्त्यांवर धुमाकूळ घालत ९ जनांवर हल्ला केला होता. यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसेच एखतपूर , चिंचोली , महूद रोड व अन्य परिसरात लांडग्यांची भीती कायम होती . दरम्यान , रविवारी (दि . २४) पाहटे एखतपूर येथील गणेश हणमंत इंगोले यांना लांडगा मृतावस्थेत दिसून आला . वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर व पथकाने एखतपूर येथील हनुमंत जनोबा इंगोले यांच्या शेतात मृत लांडग्याचा पंचनामा केला. त्यास सांगोला येथे आणले . पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून टी. टी. सी सेंटरकडे नमुने पाठविण्यात आले. त्यानुसार अहवाल आला असून सादर लांडग्याला रेबीजची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यानच्या काळात ज्या ९ नागरिकांवर लांडग्याने हल्ला केला, त्या सर्व बाधित नागरिकांना रेबीज प्रतिकार लास देण्यात आली आहे. तथापि , त्यांनी लसीचे पुढील डोस घेणे गरजेचे असल्याचे मगर यांनी सूचित केले