पेठवडगाव,तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटील हिची कझाकस्तान या ठिकाणी होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अभिज्ञा दहा मीटर एअर पिस्टल, २५ मीटर स्पोर्ट पिस्टल खेळ प्रकारात खेळते. तिची निवड वरिष्ठ गटातून २५ मीटर स्पोर्ट पिस्टल प्रकारातून झाली आहे.
ही स्पर्धा कझाकिस्तान येथे ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत होणार आहे. सदर स्पर्धेसाठी भारतातून ७४ खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी ४ निवड चाचण्या आणि एक राष्ट्रीय स्पर्धा व आंतरराष्ट्रीय स्पर्धा याच्यामधून सरासरी गुणावर आधारित निवड केली जाते. अभिज्ञा पाटील सध्या भारती विद्यापीठ (पुणे) येथे मॅनेजमेंट स्टडीज या विषयावर संशोधन करीत आहे. तिला आ. विश्वजीत कदम यांचे प्रोत्साहन तर उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभले. ती पुणे क्रिडा प्रबोधिनीची अनिवासी आंतरराष्ट्रीय नेमबाज पटू आहे. तिला कोच म्हणून रौनक पंडित, संदीप तरटे, श्रीकृष्ण उद्योगचे अध्यक्ष बी. के. चव्हाण व एम के चव्हाण आणि पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आणि विद्याताई पोळ तसेच अभिजीत गायकवाड यांचे प्रोत्साहन मिळाले.
