पेठवडगाव, येथे घरगुती व सार्वजनिक गणेश प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. युवक मंडळे व नागरिकांत उत्साहाचे वातावरण होते. येथील वडगाव पालिकेचे स्वच्छता दूत संतोष सनगर यांनी आपल्या घरी मुस्लिम बांधवांच्या हस्ते सलग दहाव्या वर्षी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.
ही गणेश प्रतिष्ठापना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन हातकणंगले तालुका उपाध्यक्ष आदिलशहा फकीर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फिरोज बागवान, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुरज जमादार, नाझीम मुल्ला, सिराज जमादार यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी पत्रकार संतोष सनगर, उत्कर्ष सनगर, सतेज मानकर, उदय मगदूम, सारिका सनगर, समृद्धी सनगर, संकेत
सनगर यांचे सह मुस्लिम बांधव उपस्थित होते. शहरात शंभरावर गणेश मंडळांनी वाद्य मिरवणुकांनी गणेश प्रतिष्ठापना केली. वडगाव पोलिसांनी पालिका चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकासह वडगाव परिसरातील वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये पोलीस बंदोबस्त होता.
