राजारामबापू पाटील कारखाना कार्यस्थळावर श्रींचे मोठ्या उत्साहात स्वागत

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरूल, कारंदवाडी व तिप्पेहळ्ळी- जत युनिट कार्यस्थळावर श्रींचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. साखराळे येथे कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, वाटेगाव – सुरूल येथे संचालक प्रकाशराव पवार, कारंदवाडी येथे संचालक राजकुमार कांबळे, तर तिप्पे हळ्ळी येथे कामगार प्रतिनिधी विकास पवार यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

 संचालक कार्तिक पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव डी. एम. पाटील, विजय मोरे, मनोहर सन्मुख,कामगार नेते राजेंद्र चव्हाण, तानाजीराव खराडे, सुनिल सावंत, प्रेमनाथ कमलाकर, महेश पाटील, विश्वनाथ पाटसुते, संतोष खटाववर,धनाजी लाड, सुनिल जाधव, विरेसन गायकवाड, संभाजी खोत, संजय सत्रे, संदीप घनवट वाटेगाव सुरूल येथे संताजी चव्हाण, संभाजी सावंत,कारंदवाडी येथे संग्राम चव्हाण, उमेश शेटे, तर तिप्पेहळ्ळी येथे नंदकिशोर जगताप, श्रीनिवास कुंभार यांच्यासह अधिकारी व कामगार सहभागी झाले होते.

कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाने कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार ३० ऑगस्ट ला ‘माझ्या नवऱ्याची बायको’, मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे ही नाटके, तर गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी नाद तालवादकांचा हा मुंबई येथील ऑर्केस्ट्रा आयोजित केला आहे. याशिवाय इस्लामपूर ते कारखाना ‘राजारामबापू सद्भावना रॅली’, ‘कामगारांचा कलाविष्कार’, ‘रस्सीखेच’ व विविध स्पर्धा, महिलांच्यासाठी गौरी-गणपती गृह सजावट, झिम्मा फुगडी आदी स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच प्रा. डॉ. विनोद बाबर कराड, प्रा. डॉ. सूरज चौगुले साखराळे, प्रा. युवराज पाटील गारगोटी, संभाजी यादव गडहिंग्लज यांची चारी युनिटवर व्याख्याने, आणि खास ऑर्केस्ट्रा तीन युनिटवर होणार आहे. या शिवाय सर्व युनिटवर महाप्रसाद होणार आहे.