आष्टा परिसरातील पूरग्रस्त पिकांचे पंचनामे

आष्टा (Ashta) जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने वारणा व कृष्णा नदीला महापूर आले. नदी काठावरील काही भागात कमी अधिक प्रमाणात पूरसदृश्य स्थिती निर्माण न झाली. ज्या गावातील शेत 7 जमिनीमध्ये पुराचे पाणी येऊन गेले त्या भागातील पिकांची पाहणी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. , तात्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिल्या. 

त्यानुसार आष्टा अप्पर तहसील कार्यालयाचे अप्पर तहसीलदार 5 राजशेखर लिंबारे यांनी पथकाला न सोबत घेऊन कृष्णा काठावरील र शिरगाव, वाळवा, मर्दवाडी, म कारंदवाडी, कृष्णानगर, तसेच वारणा काठावरील, शिगाव, बागणीसह काठावरील भागातील पूरग्रस्त पिकांची पाहणी केली त्या ठिकाणी सुरू असलेल्या पंचनाम्याची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी विशाल उदगिरे, ग्रामसेविका ज्योती मोहटकर, कृषी सहाय्यक सावित्री आटूगडे, महसूल सेवक रमेश रसाळ, कृष्णा नगर पोलीस पाटील शितल पाटील, शेतकरी बाळासाहेब वाडकर, महेश वग्यानी, सुरेश वाडकर, शिवाजी वाडकर, शंकर वाडकर, अशोक कोळी, सुनील वाडकर आदी उपस्थित होते.