आटपाडी,(Aatpadi) राजकारणात वावरणाऱ्या शिक्षकांविरोधात बहुजन समाज पार्टीचे खानापूर विधानसभा अध्यक्ष संतोषराव हेगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ,जिल्हा पोलीसप्रमुख तसेच मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री , शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवल्या आहेत. या संदर्भात त्यांनी मुबंईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील अनेक शिक्षक राजकीय नेत्याप्रमाणे तालुक्यामध्ये वावरत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये उघडपणे राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसतात. याचा परिणाम तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होताना दिसत आहे. प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
