मोबाईल दुकान फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

सांगोला शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मोबाईल दुकानावरील पत्रा उचकटून, अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ५९ हजार ४८९ रुपये किंमतीचे ११ मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी विजय कुंडली राऊत (रा. राऊत मळा, सांगोला) यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. विजय राऊत यांचे सांगोला शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर द मोबाईल स्पेस दुकान आहे. २८ रोजी ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर दुसन्या दिवशी २९ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुकानाकडे गेले असता, दुकानावरील पत्रा उचकटुन तसेच दुकानामधील पी. ओ. पी. सोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मोबाईल चोरून नेले असल्याचे निदर्शनास आले.