शिरोली व संभापूर येथील ३४ जण हातकणंगले तालुक्यातून हद्दपार

टोप,  शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरोली पुलाची व संभापूर मधील ३४ जणंना गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हातकणंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही हद्दपार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता प्रक्षोभक विचारसरणीचे, आडदांड, अविचारी, ज्यांचे वर्तनात अद्यापही सुधारणा झालेली नाही, अशा आरोपींची यादी बनवून हद्दपारीची कारवाई केली. हद्दपार आरोपींमध्ये अविनाश अनिल कोळी, श्रीकांत तानाजी मोहिते, कार्तिक परशुराम राजुगरीकर, ऋषिकेश ऊर्फ प्रताप शिवाजी भोरे, अली ऊर्फ जमीर बाले चाँद तानेखान, विकास शिवाजी धनवडे, विकी आप्पासो सनदे, अभिजीत अनिल कोळी, ऋषिकेश बजरंग पोवार, पृथ्वीराज गजानन यादव, शुभम महादेव यादव, ऋत्विक बजरंग पोवार, आदिनाथ बाळासो यादव, वैभव राजू बडेकर, आकाश संभाजी आणुसे, अर्जुन भगवान कारंडे, काशीनाथ संपत्त कारंडे, राज भरत कटबुगोळ, कुलदिप भारत कारंडे, सुरज भारत कारंडे, राजवर्धन संदिप बंडगर, अविनाश आकाराम कारंडे, सुरज नामदेव झिरंगे, पवन संभाजी झिरंगे, प्रमोद पंडित झिरंगे, प्रथमेश मोहन ढाले, प्रविन रमेश राठोड, गौतम गणेश देशपांडे, साहिल संजय कांबळे, सतीश भिमराव कांबळे, चिन्मय जगधीश कांबळे, विजय तानाजी गोंदणे, संयोग श्रीमंत कांबळे यांचा समावेश आहे.