हातकणंगले येथील आळते ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर यांच्याकडून प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थी निमित्त प्रत्येकांच्या घरी गणरायाचे आगमन थाटात व्हावे म्हणून मुर्त्या घरापर्यंत नेण्यासाठी मोफत रिक्षा ठेवल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणाच्या मुर्त्या भिजू नयेत किंवा नेताना दुखावू नयेत म्हणून हा उपक्रम ते गेल्या दहा वर्षा पासून स्वखर्चाने राबवतात.
यासाठी रमजान नदाफ, तौफीक मुजावर, रियाज मुजावर, दस्तगीर मुजावर, प्रकाश संनद यांच्या पाच रिक्षा ठेवण्यात आल्या.
हातकणंगलेत गणेशमूर्ती नेण्यासाठी मोफत रिक्षाची सोय
