आष्ट्यात बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आष्टा(Ashta)  कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूरच्या नूतन सभापतीपदी डॉ. अशोक पाटील (रा. तांबवे) व उपसभापती अपर्णा ढोले (रा. काकाचीवाडी) यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचा आष्टा भाजीपाला मार्केट मधील व्यापारी बंधूंनी सत्काराचे आयोजन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 यावेळी भाजीपाला मार्केट मधील सर्व आडते व्यापारी व बाजार समितीचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना वैभव शिंदे यांनी बाजार समितीच्या अनुषंगाने विविध विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करून देऊ, अशी ग्वाही दिली. नूतन सभापती डॉ. अशोक पाटील यांनी बाजार समितीच्या सर्व घटकांना सोबत घेऊन आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे नमूद केले. मार्केट कमिटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपसभापती झालेने अपर्णा ढोले यांचे कौतुक होत आहे.

 यावेळी माजी सभापती संदीप पाटील, संचालक बाळासाहेब इंगळे, शिवाजी ढोले, संतोष ऐतवडे, अजित माने, सुनील माने, सागर गंगथडे, श्रीनिवास खोत, प्रमोद माने, शुभम फाळके, मोहन पाटील व बाजार समितीचे सचिव विजयकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.