सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर प्रा. जगदीश चेडे यांनी मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली . या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अमोल पवार , बाबासाहेब इंगोले यांनी केले.