खानापूर शासनाने यावेळेस मान दिलेल्या माध्यमिक प्रशाला बेणापूर-सुल्तानगादे व कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र, बेणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे अध्यक्षस्थान ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबनराव (आण्णा )हसबे यांनी भूषविले. सांगली जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र (भाऊ ) शिंदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उदघाटनप्रसंगी प्रतापराव शिंदे (सांगली जिल्हा तालीम संघ ) व हणमंतराव जाधव (पोलीस उपनिरीक्षक,अधिकारी,महाकुस्ती परिषद ) यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन केले. स्पर्धेमध्ये १७५ स्पर्धकांनी भाग घेतला. पैकी १५ मुलींनी सहभाग नोंदवला. १४ वर्षे मुले ३५ वजन गटात प्रमोद सराटे पाटील,३८ वजन गट सूरज तामखडे, ४१ वजन गट आयुष शिंदे,४४ वजन गट,हर्षवर्धन रस्ते,४८ वजन गट , श्रेयस मलवडकर,६८ वजन गट; अलंकार शिंदे माध्यमिक प्रशाला वेणापूर या स्पर्धकाने प्रथम क्रमांक मिळाला.
मुलींमध्ये आरोही घाडगे , श्रद्धा तेली,सरस्वती चव्हाण, सही वाघमोडे,धनश्री पाटील इत्यादी खेळाडूंची सांगली जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये १७५ पैकी २५ मुलांची जिल्हास्तरावर निवड झाली. कार्यक्रमाला विनायक पाटील (सांगली जिल्हा तालीम संघ ) धनंजय महाडिक , यशवंत चव्हाण सर (क्रीडा समन्वक ,खानापूर तालुका ), रवींद्र गायकवाड (क्रीडा अध्यक्ष , सांगली जिल्हा तालीम संघ ) हणमंतराव तामखेडे,जयपाल वाघमोडे (कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन ), सागर थोरात (सामाजिक कार्यकर्ते ), सुहास (नाना )शिंदे (माजी जिल्हा परिषद सदस्य , सांगली ) गणपतराव (आप्पा )भोसले, कृष्णदेव (बाबा ) शिंदे,सयाजी शिंदे मान्यवरांनी हजेरी लावली. प्रास्ताविक माध्यमिक प्रशाला वेणापूर – सुल्तानगादेचे मुख्याध्यापक आर. बी. `घाडगे यांनी केले. व कै . बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्र, बेणापूर येथील सर्व सदस्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले.
