कुऱ्हाडीचा धाक दाखवत दाम्पत्यास मारहाण

हातकणंगले,  पुर्व वैमनस्यातून तलवार व कुन्हाडीचा धाक दाखवून शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी रुई व हातकणंगले येथील सहाजणांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबतची फिर्याद सौ. तेजश्री कुमार पडियार (वय ३२, रा. रुई) यांनी दिली आहे. ही घटना ३ सप्टेंबरला सायंकाळी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आवारात घडली.याप्रकरणी प्रेम लोंढे, हिराबाई लोंढे, राणी सकट (तिघेही रा. रूई) व राहुल बाबासो चौगुले, अक्षय रमेश चौगुले, संजय कुंडलिक चौगुले हे (तिघे रा. हातकणंगले) अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 याबाबत माहिती अशी, तेजेश्री पडियार, प्रेम लोंढे, हिराबाई लोंढे, राणी सकट, राहुल बाबासो चौगुले यांच्यामध्ये पैशाच्या देवघेवीवरून रुई येथे वाद झाला होता. यावेळी प्रेम लोंढे याने कुऱ्हाडीचा धाक दाखवून सर्वांनी शिवीगाळ करत पैसे परत मागायचे नाहीत, अशी धमकी दिली होती. याची तक्रार देण्यासाठी तेजश्री पडियार या पतीसमवेत हातकणंगले पोलीस ठाण्यात आल्या होत्या. दरम्या तक्रार दिल्याच्या रागातून पुन्हा त्यांच्यात पोलीस ठाण्याच्या व वाद झाला. यावेळी संजय चौगुले याने गाडी रेस करत सोबत आणलेल्या तलवारीने धाक दाखवून धमकी देत तेजश्री पडियार यांचा हात धरत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्याचबरोबर वरील सहाजणांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत पडियार दाम्पत्याला मारहाण केली.