आष्ट्यात आम. पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

लोकनेते स्व. राजारामबापू पाटील व आमदार जयंत पाटील यांच्या वरती एकेरी भाषेत वाचाळ… अन. आमदार पदाला अशोभनीय अपशब्दांचा वापर करीत टीका केल्याबद्दल जतचे आम. गोपीचंद पडळकर यांचा धनगर समाज व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. येथील बसस्थानक चौकात कार्येकर्ते नेते जमा झाले. आ. कार्येकर्ते नेते जमा झाले. आ. पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. 

संभाजीराव कचरे, शिवाजीराव चोरमुले, रामचंद्र सिद्ध, के एमाने, बाबासाहेब सिद्ध, रमेश हाके, सयाजी गावडे, पोपट शेळके, यांच्यासह विराज शिंदे, केदार आटुगडे, सुनिल माने, अनिल पाटील, यांनी आम. पडळकरांचा समाचार घेतला. आम. पडळकर यांनी औकातीत राहून टीका करावी अन्यथा धनगर समाज जशास तसे उत्तर देईल असा इशारा समाजातील नेत्यांनी दिला. प्रकाश घस्ते यांनी निषेध केला. यावेळी अनिल सिद्ध, शशिकांत भानुसे, रघुनाथ जाधव, पांडुरंग ढोले, सोमाजी डोंबाळे, प्रकाश सिद्ध, संभाजी चोरमुले, पिंटूशेळके, भीमराव माने, दत्ता ढोले, शंकर पिंगळे, आदी उपस्थित होते.