ओबीसीने संघर्ष करून मिळवलेले आरक्षण कोणालाही वाटून घेता येणार नाही सरकारने जर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात सामावून घेतले तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा इस्लामपूरातील ओबीसीच्या बैठकीत देण्यात आला.
नंदकुमार कुंभार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ आणि १८ पगड जाती जमाती मिळून मराठा आरक्षण विरोधात आंदोलन करणार आहे. तालुका निहाय ओबीसी समाजाने तहसीलदारांना निवेदन देऊन मराठा ओबीसी आरक्षण रद्द करणे बाबत मागणी करावी. धनंजय माळवदे म्हणाले, जिल्ह्यातील ओबीसी समाजाने एकत्र आले पाहिजे ५८ लाख कुणबी दाखले जे पारित झाले आहेत ते रद्द करा. अरुण खरमाटे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३४० कलमाच्या आधारे ओबीसी आरक्षण दिले आहे. कोपरडी घटना व मराठा आरक्षणचा काहीही संबंध नव्हता. १९८० पासून आण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाची सुरुवात केली.
ओबीसी समाजाने बाहेर पडण्याची वेळ आली आहे. संजय विभूते म्हणाले, प्रत्येक ओबीसी समाजाच्या माणसापर्यंत पोहचले पाहिजे. एसएसी, ओबीसी यांचे दाखले शासन शोधून देत आहे. ओबीसी समाज गुलामगिरीच्या छायेत आहे. राजकीय नेते हे ओबीसी मराठा असणार आहेत. १२ बलुतेदार जातीला बाहेर काढले पाहिजे. मुंबईत षडयंत्र रचून मराठ्यांनी ओबीसी आरक्षण घेत आहे. बैठकीला धनपाल माळी, अरुण कांबळे, अजित भांबुरे म्हणाले, प्रा. आमणे, जगन्नाथ माळी, एस. एल. कुंभार, अजित भांबुरे, सदानंद कुंभार, हणमंत कुंभार, जावेद, इबुशे धनपाल माळी, संग्राम माने, अनिल माळी, सुरेश कासार, डॉ. माणिकराव झेंडे उपस्थित होते.
