बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय नको

मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात शासनाच्या निर्णयाविरोधात कोणताही निर्णय देऊ नये , अशी मागणी मराठा समाजाच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. याबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सोमवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते कृष्णाजी मोरे यांनी ॲड . श्रीकांत पाटील व ॲड . अर्जुन पवार यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की , मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शासनाच्या जी. आर. रद्द करू नये. तसेच हैद्राबाद गॅजेट मराठा -कुणबी नोंदीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याबद्दल कोणी याचिका दाखल केली, तर याबाबत कोणताही निर्णय मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय होऊ नये.