आदर्श सोसायटीची सभा उत्साहात

आटपाडी; आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सभेत पुढील वर्षी स्वमालकीच्या जागेत ऑफिस व मिटिंग हॉल बांधण्याचा निर्धार करण्यात आला.

चेअरमन प्रकाश दौंडे, व्हाईस चेअरमन दीपक देशमुख , संचालक , सचिव दत्तात्रय स्वामी, सभासद,कर्मचारी , पिग्मी एजंट यांच्या उपस्थित सभा संपन्न झाली. चेअरमन प्रकाश दौंडे, यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा मांडला. संस्थेचे १,७७१ सभासद असून भागभांडवल ९४. २३लाख ठेवी ६. लाख ,कर्जे ५. ९८ लाख ६८ हजार , गुंतवणूक २. ३७ लाख आहे. अर्थी वर्षात २६. ५४ लाख नीव्वळ नफा झाला आहे. थकबाकीचे प्रमाण ४. ०४ टक्के, तर सीडी रेशो ७०. ८७ टक्के आहे. सभासदांना ७ टक्के लाभांश दिल्याची माहिती दिली.

सभेत संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांच्या विविध क्षेत्रांत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सभेत सर्वानुमते सर्व विषय मजूर झाले. दिलीप सपाटे , सर्जेराव पाटील, ज्ञानेश्वर राक्षे व प्रसाद दीक्षित यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी सूचना मांडल्या. स्वागत राजेंद्र लाटणे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार विकास भुते यांनी मानले.